‘उद्योगिनी’ महिला गृहउद्योग मेळाव्याचा दमदार शुभारंभ...
“शिक्षण कमी आणि गरीबी असली तरी मनं खंबीर आणि हात मेहनतीस तयार असतील तर स्त्रियाही लक्ष्मीच्या पूजक बनतात, घर सावरू शकतात...” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार साहेबांचे म्हणणे आहे. त्यामुळेच साहेबांनी महिलांना छोटे छोटे उद्योग आणि महिला गृहउद्योग संस्था स्थापन करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्याचे फलित म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहिली महिला बचत गटांची चळवळ. महाराष्ट्रातील बचत गटांची चळवळ ‘यशस्विनी’ सामाजिक अभियानांतर्गत खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आकारस आली आहे. ‘यशस्विनी’च्या प्रेरणा आणि प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रातील ग्रमीण व शहरी भागात एकूण अंदाजे 4 लाख 54 हजार इतके महिला बचत गट स्थापन झाले आहेत. या चळवळीमुळे 25 लाख महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या महिला बचत गटांचे प्रदर्शन, उत्पादन व विक्रमी मेळावे विभागीय पातळीवर आयोजित करण्यात येतात. मुंबईतील महिला बचत गटांचा ‘उद्योगिनी’ हा गृहउद्योग आणि प्रदर्शनविक्री मेळावा सध्या घाटकोपर परिसरातील राजा शिवाजी टेक्निकल हायस्कूलच्या प्रांगणात 12 मे पर्यंत सुरू राहणार आहे.
‘मा. शरद पवार अमृत महोत्सवी कृतज्ञता वर्ष’ निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणजे घाटकोपरमध्ये सुरू असलेला हा ‘उद्योगिनी’ मेळावा. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे, ‘मंगलमूर्ती प्रॉडक्शन’च्या संचालिका संगीता अहिर, ‘क्रिस्टल ग्रुप’च्या अध्यक्षा नीता लाड, ‘मम्मीज’ बचत गटाच्या संचालिका पल्लवी पाटील, मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ, उपक्रमाच्या आयोजिका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा चित्रा किशोर वाघ व स्थानिक नगरसेविका राखी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

The 8 best casino game experiences for your money - DrmCD
ReplyDeleteBest Casino 안성 출장안마 Slots 안양 출장안마 Experience 2021 · Wild 태백 출장샵 · 과천 출장안마 777 Casino · Caesars Casino · Vegas Slots Online · Casino Bonuses · Video Poker 수원 출장안마 · Table Games.