शरद पवार साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र लगोरी फेडरेशनच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लगोरी स्पर्धेची सांगता आज झाली. देशातल्या कानकोपऱ्यातून सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे आणि विजेत्यांचे अभिनंदन! अनिकेत तटकरे यांनी फेडरेशनची जबाबदारी स्वीकाल्यावर राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी क्रिकेट, कबड्डी, खो-खो या खेळांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मान मिळवून दिला. त्याप्रमाणेच लगोरी या खेळालाही मान्यता मिळावी, असा प्रयत्न अनिकेत तटकरे यांनी करावा. मा. क्रीडामंत्री विनोद तावडे यांना विनंती आहे की, या खेळाला सरकारने मदत द्यावी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लगोरीला नेण्यासाठी सहकार्य करावे.

0 comments:

Post a Comment

 
Top