पक्षासाठी आव्हानात्मक काळात मला राज्याचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल आदरणीय पवारसाहेब आणि पक्षातील इतर नेत्यांचे मी आभार मानतो. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरोघरी पोहचवून पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत केली जाईल. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पक्षात संधी दिली जाईल.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही धर्मांध शक्तीशी हातमिळवणी करणार नाही. सध्या एकीकडे नैसर्गिक संकटे तर दुसरीकडे सरकारच्या अन्यायी धोरणामुळे राज्यातील शेतकऱी भरडला जात आहे अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकर-यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. लवकरच पक्षाची जिल्हास्तरीय, प्रदेश पातळीवरील नवीन कार्यकारिणी घोषित होईल. नेमलेले पदाधिकारी, संपर्क नेते यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. पुनश्चः एकदा पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्त्यांचे आभार...

0 comments:

Post a Comment

 
Top